पुण्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेली वास्तू म्हणजे शनिवार वाडा. पेशव्यांच्या कारकिर्दीत 1730 साली या वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि 1732 मध्ये हे भव्य वास्तुशिल्प पूर्ण झाले. माहितीनुसार, शनिवार वाड्याची पायाभरणी शके 1651 साली माघ महिन्यात शुक्ल पक्षात तृतीयेला झाली. या दिवशी 10 जानेवारी 1730 ही तारीख होती आणि शनिवार होता. तसेच वाड्याची वास्तूशांती 22 जानेवारी 1732 रोजी झाली. आज पुण्यातील या शनिवार वाड्याला 293 वर्षे पूर्ण होत आहेत. शनिवार वाडा मराठा साम्राज्याच्या वैभवाचे प्रतीक असून, त्याचे नाव ‘शनिवार’ हे शिलान्यासाच्या दिवशी असलेल्या शनिवारवरून ठेवण्यात आले. या वास्तूमध्ये राजवाडा, सभागृह, बागा, कारंजे, आणि भव्य दरवाजे यांचा समावेश आहे.

पेशव्यांच्या राजवटीत या वाड्याला राजकीय आणि सांस्कृतिक केंद्राचे महत्त्व होते. मात्र, 1828 साली लागलेल्या आगीत वाड्याचा बराचसा भाग नष्ट झाला, परंतु आजही त्याचे भव्य अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. शनिवार वाडा मराठी इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय असून, आज तो पर्यटक आणि इतिहासप्रेमींसाठी मोठे आकर्षण केंद्र आहे. वाड्याचा मुख्य दरवाजा ‘दिल्ली दरवाजा’ म्हणून ओळखला जातो, जो भक्कम लाकडाचा असून त्यावर लोखंडी खिळे आहेत. वा आग्रा महाल हा वाड्यातील सर्वात सुंदर भागांपैकी एक होता, जो खास पेशव्यांसाठी राखीव होता. वाड्यात हजरत’ नावाचा एक फवारा होता, जो त्यावेळी स्थापत्य आणि अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.

 Shaniwar Wada Completes 293 Years:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)