मुंबई मध्ये आजपासून दुचाकीवर बसलेल्या दोघांनाही हेल्मेट सक्ती लागू होत आहे. चालकासोबतच मागे बसलेल्या व्यक्तीनेही हेल्मेट घालणं बंधनकारक आहे. तसे न केल्यास दंड आणि लायसन्स तीन महिने सस्पेंड होण्याची कारवाई होऊ शकते असे मुंबई ट्राफिक विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबई ट्राफिक ट्वीट
मोटार वाहन कायद्यानुसार मोटार सायकल चालकासह सहप्रवाशालाही हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. मुंबई शहरातील रस्त्यावर मोटार सायकलवरुन प्रवास करताना जे प्रवासी हेल्मेट वापरणार नाहीत, त्यांच्यावर दि. ९ जूनपासून कारवाई करण्यात येणार आहे. #RoadSafety pic.twitter.com/n3grZh8jSb
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) June 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)