महाराष्ट्रात ऐन एप्रिल महिन्यातच उन्हाचा पारा 40 शी जवळ असताना या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या लवकर सुरू करण्याचं आवाहन केले आहे. तसेच जनतेला आणि मनसैनिकांना मुक्या पक्षी, प्राण्यांची काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा असे राज ठाकरे म्हणाले आहेत.
पहा राज ठाकरे यांचे ट्वीट
सस्नेह जय महाराष्ट्र,
गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.
मुळात अशी लाट येण्याची शक्यता…
— Raj Thackeray (@RajThackeray) April 16, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)