पुण्याचे भाजपा खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. आज सकाळी दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये ते दाखल होते मात्र त्यांची जीवनाशी झुंज अपयशी ठरली आहे. लाईफ सपोर्टवर असलेले गिरीश बापट यांनी अखेर आज अखेरचा श्वास घेतला. एका दुर्धर आजाराशी मागील काही महिने ते झुंजत होते. या आजारपणातच त्यांचं निधन झाले आहे. पुणे आणि गिरीश बापट हे एक वेगळंच नात होतं. त्यांच्या जाण्याने पुणे भाजपाला मोठं नुकसान झालं आहे,
#पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार #गिरीष_बापट यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी दीर्घ आजारानं पुण्यात निधन. #GirishBapat #Pune #Maharashtra @DDNewslive pic.twitter.com/oz62PWwlpn
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) March 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)