अस्पृश्य, दलितांनाही शिक्षणाची दारं खुली करण्यासाठी पुण्यात सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यासोबत काम करणार्या फातिमा शेख यांची आज जयंती आहे. 191 व्या जयंती निमित्त गूगलने डूडल साकारलं आहे तर अनेक मान्यवरांनी सोशल मीडीयात खास पोस्ट शेअर करत त्यांना मानवंदना दिली आहे.
वर्षा गायकवाड
भारतीय महिलांची अनेक क्षेत्रातील गरुड झेप आणि प्रगती; त्यामागे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व कर्तृत्ववान सहकारी फातिमा बेगम शेख यांच्या कार्याचे आणि बलिदानाचे प्रचंड योगदान आहे.आजच्या दिवशी शेख यांच्या प्रेरक स्मृतीस अभिवादन करताना महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने कार्य करूया! pic.twitter.com/625yBNq6m8
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) January 9, 2022
नवाब मलिक
भारतातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका, सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी व स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या फातिमा शेख यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!#FatimaSheikh pic.twitter.com/j6uX4z5Phd
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 9, 2022
जितेंद्र आव्हाड
या देशाच्या संस्कृतीची ओळख वाटते.सावित्री बाई यांच्या इतकेच फातिमा शेख यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा,अस माझं मत आहे.
फातिमा शेख यांच्या प्रेरक स्मृतीस विनम्र अभिवादन..!
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)