उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये गुगल मॅपवर विश्वास ठेऊन प्रवास केल्याने 2 युवतींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-लखनौ महामार्गावरील मुरादाबाद जिल्ह्यातील मुंधापांडे पोलीस स्टेशन परिसरात, मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या भीषण रस्ता अपघातात दोन मुलींचा मृत्यू झाला, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले. गुगल मॅपमधील चुकीमुळे कार चुकीच्या दिशेने वळल्याने समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली व हा अपघात झाला. दोन्ही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नैनीतालमधील नीम करौली बाबांच्या धामाचे दर्शन घेतल्यानंतर हे चौघे रामपूरमार्गे रोहतक येथील त्यांच्या घरी परतत होते.

मुरादाबादजवळ, हायवे कटवर गुगल मॅपने चुकीची दिशा घेतली, त्यामुळे त्यांची कार झिरो पॉइंटवर एका कंटेनरला धडकली. अपघातानंतर कारचे चारही दरवाजे ऑटो लॉक झाल्याने चारही जण आत अडकले. तासाभराच्या प्रयत्नानंतर पोलीस आणि स्थानिक लोकांनी लोखंडी रॉडने दरवाजे तोडून सर्वांना बाहेर काढले. यामध्ये एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या मुलीचा रुग्णालयात मृत्यू झाला. गंभीर जखमी दोन्ही मुलांना प्राथमिक उपचारानंतर उच्च केंद्रात रेफर करण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गुगल मॅपवरून चुकीच्या दिशानिर्देशांमुळे हा अपघात घडला, ज्यामुळे कार चुकीच्या कटच्या दिशेने वळली. (हेही वाचा: Nitin Gadkari On Indian Roads: भारतीय रस्ते दोन वर्षांत अमेरिकेच्या महामार्गांना मागे टाकतील- नितीन गडकरी)

गुगल मॅपने दाखवला मृत्यूचा मार्ग:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)