Moradabad: उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये स्कूटरवरून जाणाऱ्या पती-पत्नीला (couple) एकाने त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यावर संतप्त महिलेने तरूणाला मारहाण (Woman Thrashes Man With Slipper) केली. ही घटना जवळच असलेल्या दुकानाजवळ कॅमेऱ्यात कैद झाली. ही घटना 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता घडली. तरूणाने अश्लील कमेंट्स आणि हावभाव केल्याने महिलेने त्याला मारहाण केल्याचे समजत आहे. तिच्या चप्पलने महिलेने तरूणाला मारहाण केली. व्हिडीओत महिलेचा नवराही त्याला मारहाण करताना दिसत आहे.

महिलेची तरुणाला चप्पलने मारहाण 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)