गूगल (Google) कडून आज शिक्षिका आणि महिलांच्या न्याय, हक्कांसाठी लढणार्या फातिमा शेख यांच्या कार्याला वंदन करण्यासाठी खास डूडल (Doodle) साकारण्यात आले आहे. आज डूडलवर झळकणार्या फातिमा शेख (Fatima Sheikh) या पहिल्या मुस्लिम शिक्षिका होत्या. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची कवाडं उघडणार्या सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि ज्योतिबा फुले (Jyotirao Phule) यांचा वसा फातिमा शेख यांनी पुढे चालवला. 1848 साली दलित मुले आणि स्त्रियांसाठी पहिली शाळा त्यांनी सुरू केली.
9 जानेवारी 1831 दिवशी फातिमा शेख यांचा पुण्यात जन्म झाल्ला होता. भाऊ उस्मान शेख सोबत त्या राहत होत्या. जात, धर्म, पंथ, लिंग या स्तरावर भेदाभद करत ज्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला होता त्यांच्यासाठी शेख यांच्या घरी सावित्रीबाई आणि फातिमा शाळा घेत असतं.
सत्यशोधक चळवळीमध्ये ज्यांनी सहभाग घेतला अशा सार्यांनाच समाजातील उच्चभ्रू लोकांकडून हीन वागणूक देण्यात आली. मात्र अशा परिस्थितीमध्येही घरोघरी जाऊन मुलींच्या कुटुंबाशी बोलून त्यांना शाळेत पाठवण्यासाठी फातिमा शेख स्वतः प्रयत्न करत होत्या. हे देखील नक्की वाचा: भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाचे विविध पैलू मांडणारे '10' अनमोल गोष्टी.
भारत सरकारने फातिमा शेख यांच्या कार्याची दखल घेत 2014 साली उर्दू पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. देशात शिक्षण क्षेत्रात काम करणार्या व्यक्तींमध्ये फातिमा शेख हे नाव देखिल तितक्याच ठळकपणे घेतले जाते.