Ajit Pawar On MLAs Disqualification: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक नव-नवीन घडामोडी घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांनंतर 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना असणार आहे. मात्र, अध्यक्षांनी या आमदारांना अपात्र ठरवले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असं अनेकांना वाटत आहे. मात्र, यावर राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार पडणार नाही, सरकारला कोणताही धोका नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. (हेही वाचा -Maharashtra Politics: आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय तातडीने घेण्यासाठी ठाकरे गटाकडून नरहरी झिरवाळांना निवेदन)
Maharashtra | "Even if 16 MLAs are disqualified, the government of Shinde and Fadnavis will not fall. There is no threat to the government," says NCP leader Ajit Pawar pic.twitter.com/CUR0WnLeEB
— ANI (@ANI) May 15, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)