देशावरील कोरोना विषाणूच्या सावटामुळे राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात कोविडमुळे आर्थिक संकटाला सामोरे जाणारे गोविंदा पथक आणि कुंभार यांनी राज्य सरकारला दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. यामध्ये काही मधला मार्ग काढावा, आमचे उत्पन्न हंडीवर अवलंबून आहे असे जय जवान गोविंदा पथकाच्या विजय निकम यांनी सांगितले.

दुसरीकडे, कुंभार राजकुमार गुप्ता म्हणतात, 'आमचे दुकान 70 वर्षांपासून येथे आहे. आतापर्यंत फक्त 30% हंडी बनवल्या गेल्या आहेत. सार्वजनिक दहीहंडीवर बंदी घालण्यात आली आहे. कोविड-19 मुळे आमचे व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहेत.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)