हॅरी पॉटर मूव्ही फ्रँचायझीमध्ये हॅग्रिडची भूमिका साकारणारे तसेच क्रॅकर या ब्रिटीश गुन्हेगारी मालिकेतील अभिनेता आणि कॉमिक रॉबी कोल्ट्रेन यांचे निधन झाले आहे. त्यांची एजन्सी WME ने हॉलिवूड रिपोर्टरला याबाबत माहिती दिली. रॉबी 72 वर्षांचे होते. कोल्ट्रेन यांचा जन्म 30 मार्च 1950 रोजी ग्लासगो, स्कॉटलंड येथे झाला. ग्लासगो आर्ट स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर, त्यांनी एडिनबर्गमधील मोरे हाऊस कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये कला विषयाचा अभ्यास सुरू ठेवला. पुढे कॉमेडी आणि थिएटरमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या कलाकाराने जेम्स बाँडच्या दोन चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना 'हॅरी पॉटर' चित्रपटातील 'हॅग्रिड'च्या भूमिकेने विशेष प्रसिद्धी मिळवून दिली. हॅग्रिड हे पात्र हॅरी पॉटर फ्रँचायझीच्या सर्व चित्रपटामधील एक महत्वाचे पात्र होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)