समीर वानखेडे आणि कुटुंबीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तिघांनी घराची recce केली. आम्ही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देऊ. कुटुंबाला सुरक्षा द्यावी, अशी मागणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी केली आहे. तसंच आमच्यावर आरोप करणाऱ्यांची आता चौकशी व्हावी, असंही त्या म्हणाल्या.

दरम्यान,  राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. ते सध्या सुरु असलेल्या क्रुझ ड्रग्स प्रकरणातील इन-चार्ज आहेत. काही मूळ कागदपत्रं पाहण्यासाठी ते वानखेडे यांच्या घरी गेले होते. त्यानंतर ANI शी बोलताना क्रांती रेडकर यांनी आपली मागणी मांडली.

ANI Tweets:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)