Mumbai Crime: मुंबईत 'एनसीबी'ची मोठी कारवाई; 50 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त, 1 कोटीची रोकडही जप्त
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अटकेत तस्कर महिलेने अनेक शहरात जाळं तयार केलं होतं. या जाळ्याच्या माध्यमातून ही महिला अंमली पदार्थांची विक्री करत होती.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईच्या डोंगरीच्या एएमआर रिजनमधील मोठ्या अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तस्करांकडून 50 कोटी किमतीचे 20 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने डोंगरीतील अंमली पदार्थ तस्करांचं जाळ उद्ध्वस्त करत तिघांना अटक केली आहे. या तस्करामध्ये एका महिलेचा देखील सामावेश आहे. अंमली पदार्थांसहित एक कोटी २० लाख रुपये आणि सोने देखील जप्त केलं आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अटकेत तस्कर महिलेने अनेक शहरात जाळं तयार केलं होतं. या जाळ्याच्या माध्यमातून ही महिला अंमली पदार्थांची विक्री करत होती.
पाहा ट्विट -
NCB-Mumbai bursts major drug trafficking syndicate from Dongri. 20 kgs Mephedrone worth Rs 50 crores seized from Dongri in multiple search operations, 3 key members of syndicate arrested. Rs.1,10,24,000 cash recovered. 186.6 gms of gold ornaments were also seized: NCB pic.twitter.com/d5ozELyno4
— ANI (@ANI) June 10, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 10, 2023 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

