Sinhagad Trek: अतिवृष्टीमुळे सिंहगडाकडे जाणाऱ्या आतकरवाडी ट्रेक मार्गावर रविवारी पहाटे दरड कोसळली आहे. या घटनेनंतर वन विभागाने ट्रेकर्सना सिंहगड किल्ला ट्रेक करण्याचा मार्ग टाळण्याचे आवाहन केले आहे. किल्ल्यावरील गर्दीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पावसाळ्यात सिंहगड किल्ला हे पर्यटकांसाठी लोकप्रिय सहलीचे ठिकाण आहे. लोणावळा दुर्घटनेत पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर सिंहगडा किल्ल्यावर पुनरावृत्ती टाळावी या करीता वन अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले आहे. पावसाळा सुरु झाल्यापासून सिंहगड किल्ल्यावर विविध ठिकाणाहून आलेल्या पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे.  (हेही वाचा-   बेदारकपणे कार चालवणे जीवाशी बेतले, दोघांचा मृत्यू, नागपूरातील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)