Nagpur Accident: बेदारकपणे कार चालवणे जीवाशी बेतले, दोघांचा मृत्यू, नागपूरातील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

दारू पिऊन आणि बेदारकपणे कार चालवणे तरुणांना जीवाशी बेतले आहे. नागपूरातील दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणाला एका हायस्पीड कारने धडक दिले आणि भीषण अपघात घडला

Nagpur Accident: बेदारकपणे कार चालवणे जीवाशी बेतले, दोघांचा मृत्यू, नागपूरातील अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
Nagpur Accident PC TW

Nagpur Accident: दारू पिऊन आणि बेदारकपणे कार चालवणे तरुणांना जीवाशी बेतले आहे. नागपूरातील दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या कुंपणाला एका हायस्पीड कारने धडक दिले आणि भीषण अपघात घडला. या घटनेत कारमधील दोन तरुणांनी जीव गमावला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. अपघातापूर्वीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळ्यात अपघात, पश्चिम बंगाल येथील फोटोग्राफरचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 2.38 च्या दरम्यान हा अपघात झाला. कार मध्ये पाच जण प्रवास करत होते. पबमधून दारू पिऊन ते घरी जात असल्याची माहिती मिळाली. कारमध्ये पण ते मद्यपान करत असल्याचे एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे मुले कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी ऐकत धिंगाणा करत होते.

कार चालकाने रस्त्याच्या मधोमध बेशिस्तपणे कार चालवली आणि कार चालवताना अनियंत्रित झाली आणि कार पुढे जाऊन कुंपणाला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा अक्षरश: चुराडा झाला. रस्त्यावर काचांचे तुकडे पडले. कारमधील दोन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आणि दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. या अपघाताची नोंद नागपूर पोलिसांनी केली.

 

 

(The above story first appeared on LatestLY on Jul 14, 2024 01:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).