Sinhagad Fort Reopens: पुण्यातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; 7 दिवसांच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेनंतर शिवराज्याभिषेक दिनापूर्वी सिंहगड किल्ला पुन्हा उघडला

सिंहगडाच्या ऐतिहासिक वैभवाला बाधा आणणाऱ्या अतिक्रमणांवर प्रशासनाने निर्णायक कारवाई केली आणि सात दिवस चाललेली ही मोहीम बुधवारी संध्याकाळी यशस्वीरित्या संपली. जिल्हाधिकारी कार्यालय, वन, पुरातत्व, महसूल आणि जिल्हा परिषद विभागांच्या संयुक्त प्रयत्नातून सरकारी आणि खाजगी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली.

Sinhagad Fort Reopens: पुण्यातील पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; 7 दिवसांच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेनंतर शिवराज्याभिषेक दिनापूर्वी सिंहगड किल्ला पुन्हा उघडला
Sinhagad Fort

पुण्यातील लोकप्रिय पावसाळी पर्यटनस्थळ असलेला सिंहगड किल्ला, यशस्वी अतिक्रमण विरोधी मोहिमेनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाच्या नेतृत्वाखालील मोहिमेत किल्ल्याच्या वारशावर परिणाम करणारी बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली. सिंहगड किल्ला हा त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक मूल्यासाठी ओळखला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक येथे येतात. नरवीर तानाजी मालुसरे आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या वारशामुळे याला विशेष महत्त्व आहे. हा किल्ला शहराच्या जवळ असल्याने, येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी असते.

आता सिंहगडाच्या ऐतिहासिक वैभवाला बाधा आणणाऱ्या अतिक्रमणांवर प्रशासनाने निर्णायक कारवाई केली आणि सात दिवस चाललेली ही मोहीम बुधवारी संध्याकाळी यशस्वीरित्या संपली. जिल्हाधिकारी कार्यालय, वन, पुरातत्व, महसूल आणि जिल्हा परिषद विभागांच्या संयुक्त प्रयत्नातून सरकारी आणि खाजगी जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आली. राज्यातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे 31 मे पूर्वी काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार सिंहगड किल्ल्यावरील अतिक्रमणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी जिंतेंद्र दुडी यांनी स्वतः पुढाकार घेऊन ती हटवली. कारवाई करण्यापूर्वी, संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. परवानग्या आणि कागदपत्रे देखील पारदर्शकपणे तपासण्यात आली. (हेही वाचा: Seaplane Tourism Project: महाराष्ट्रात पुन्हा सुरु होणार सीप्लेन सेवा; मुंबई-पुण्याला 'या' पर्यटन स्थळांशी जोडले जाणार)

Sinhagad Fort Reopens:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 05, 2025 06:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).