मुंबई मध्ये मध्य रेल्वेच्या एसी लोकलला प्रवासांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती रेल्वेने जाहीर केली आहे. यामध्ये एप्रिल ते नोव्हेंबर 23 दरम्यान 1.31 कोटी प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामधून 60.23 कोटीचं उत्पन्न रेल्वेला मिळालं आहे. मागील वर्षी याच कालखंडामध्ये 87.61 लाख प्रवाशांनी प्रवास करून 39.43 कोटीचं उत्पन्न कमावलं आहे. केवळ या महिन्यात सरासरी 16.48 लाख प्रवाशांनी 7.53 कोटीचं उत्पन्न मिळवून दिलं आहे. नक्की वाचा: Mumbai AC Local मध्ये बनावट तिकीट बनवून प्रवास करणार्‍याला AC ने पकडलं! 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)