Rohit Pawar On BJP: तत्कालीन राज्य शासनाने वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना 2011 पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसार अल्पसंख्यांक विकास विभागाद्वारे वक्फ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेस नेते, आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलं आहे की, 'त्रयस्थ संस्था किंवा व्यक्ती ज्यांना काडीची अक्कल नसते, अशांच्या मदतीने काहीतरी वेगळेच मुद्दे उकरुन काढत जनतेच्या मूळ मुद्द्यांपासून लक्ष हटवायचे ही भाजपची जुनी सवय आहे. राज्यात सध्या शेतकऱ्यांमध्ये आणि युवकांमध्ये मोठा असंतोष असल्याने या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपने वक्फ बोर्डाच्या निधीचा मुद्दा पुढे आणला आहे. वक्फ बोर्डाला दिला गेलेला निधी नियमित निधी असून वेगळा निधी दिला गेला असा विषय नाही. त्यामुळे भाजपच्या अजेंड्याला बळी न पळता बोगस बियाणे, शेतकरी कर्जमाफी आणि बेरोजगारी, पदभरती या विषयांवर मीडियाने भर द्यायला हवा.

रोहित पवार ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)