Amruta Fadnavis Attended Mangalagaur Event: अमृता फडणवीस यांनी अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा येथे ‘मंगळागौर’ महोत्सवाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात 2000 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी महिलांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला. 'मंगळागौर' ही महाराष्ट्राच्या संस्कृतीतील दीपस्तंभ आहे. नवीन लग्नानंतर 5 वर्षांनी मंगळागौर खेळण्याची प्रथा आहे. मंगळागौरीच्या दिवशी सर्व महिला एकत्र जमतात आणि रात्री जागरण करतात. रात्री जागून खेळ खेळण्याची प्रथा आहे. वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई येथे सर्व जाती धर्माचे नागरिक राहतात. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार आणि 'टीआय' फाऊंडेशनच्या अध्यक्षा भारती लव्हेकर यांनी श्रावण सोहळा मंगळागौर उत्सवानिमित्त मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
वर्सोव्यात अमृता फडणवीसांची घुमली फुगडी',
मंगळागौर हा सुंदर व्यायाम प्रकार
युती आणखी मजबुत होणार
मणिपूरच्या घटनेत राजकारण जास्त म्हणाल्या....#amrutafadnavis #fugadi #manglagour @fadnavis_amruta pic.twitter.com/Y4xQHDNWbs
— News State Maharashtra Goa (@NSMaharashtra) August 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)