Mumbai Road Rage Case: दारूच्या नशेत वर्सोव्यात दुचाकीस्वाराचे महिला क्रिएटिव्ह डायरेक्टरसोबत गैरवर्तन, पहा व्हिडिओ
तरुणीमा वर्मा, असं या महिलेचं नाव आहे. वर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला आहे.
Mumbai Road Rage Case: मुंबईतून एक रोड रेजची घटना समोर आली आहे. एका महिला क्रिएटिव्ह डायरेक्टरसोबत मुंबईच्या वर्सोवा परिसरात एका मद्यधुंद दुचाकीस्वाराने गुरुवारी, 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीमा वर्मा, असं या महिलेचं नाव आहे. वर्माने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा त्रासदायक अनुभव शेअर केला आहे. वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना घडली तेव्हा ती मुंबईतील वर्सोवा जेट्टीवर शूटिंग करून इतर दोघांसोबत ऑटो-रिक्षातून प्रवास करत होती. ऑटोचालक बेदरकारपणे गाडी चालवत असलेल्या दुचाकीस्वारांला धडकला. त्यानंतर ऑटोचालक आणि दुचाकीस्वारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. तसेच यावेळी मद्यधुंद व्यक्तीने रिक्षात बसलेल्या वर्मा यांच्यासोबत गैरवर्तन केलं.
दारूच्या नशेत वर्सोव्यात दुचाकीस्वाराचे महिला क्रिएटिव्ह डायरेक्टरसोबत गैरवर्तन, पहा व्हिडिओ -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 04, 2024 04:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

