Mumbai Water Cut on September 2: मुंबई मध्ये सोमवारी जोगेश्वरी, अंधेरी भागात काही ठिकाणी पाणी पुरवठा राहणार विस्कळीत; BMC ची माहिती

के पूर्व विभागात वेरावली जलाशय मध्ये बीएमसी कडून काही दुरूस्ती आणि देखभालीचं काम हाती घेतलं जाणार असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

Mumbai Water Cut on September 2:  मुंबई मध्ये सोमवारी जोगेश्वरी, अंधेरी भागात काही ठिकाणी पाणी पुरवठा राहणार विस्कळीत; BMC ची माहिती
Water Cut | Pixabay.com

मुंबई मध्ये 2 सप्टेंबर दिवशी पाणी पुरवठा काही भागामध्ये विस्कळीत राहणार आहे. बीएमसी कडून Veravali Reservoir-II मध्ये 900 mm चा butterfly valve बदलला जाणार आहे. या देखभाल आणि दुरूस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. 2 सप्टेंबरला मध्यरात्री 1 वाजता हे काम सुरू केले जाणार असून त्याच दिवशी दुपारपर्यंत काम पूर्ण केले जाणार आहे. मात्र या कामामुळे जोगेश्वरी, अंधेरी पूर्व आणि पश्चिम भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

बीएमसीच्या माहितीनुसार, हरी नगर, शिवाजी नगर, शंकरवाडी, पार्सल कॉलनी या भागामध्ये पाण्याचा दबाव कमी राहणार आहे. या कामामुळे नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागत असल्याने त्यांनी पाणी साठवून ठेवण्याचं देखील आवाहन केले आहे.

पहा मुंबईत 2 सप्टेंबरला कोणत्या भागात पाणीपुरवठा राहणार विस्कळीत? 

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 31, 2024 09:43 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).