शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपप्रणीत आघाडी अर्थात एनडीएमध्ये (NDA) प्रवेश केला आहे. अजित पवार आठ आमदारांसह राजभवनात पोहोचले आणि येथे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. आपल्याला राष्ट्रवादीच्या 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. राष्ट्रवादीतील फुटीमुळे राज्यात राजकीय उलथापालथ झाली आहे. आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयातील बंडखोर नेत्यांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी काळ फासल्याची घटना घडली.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)