Indian Rock Python: मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे घाटकोपर (पश्चिम) परिसरात एका इमारतीच्या टॉवरच्या 13व्या मजल्यावर चार फुटांचा अजगर पोहोचला. मात्र, प्राणीप्रेमींनी याबाबत वनविभागाला माहिती दिल्यानंतर वनविभागाने त्याची सुटका केली. तिथे राहणाऱ्या अजगर तेराव्या मजल्यावर चढलेलं पाहून आश्चर्यचं वाटलं. मुंबईतील आयटी फर्मसाठी काम करणारे प्राणी कार्यकर्ते सूरज साहा यांनी TOI ला सांगितले की, मंगळवारी घाटकोपर (पश्चिम) एलबीएस रोडवरील व्रज पॅराडाईज इमारतीच्या टेरेसवर भारतीय रॉक अजगर दिसला. टेरेसवर काही बांधकाम सुरू असल्याने अजगर पूर्णपणे सिमेंटमध्ये अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी आम्ही तातडीने राज्याच्या वनविभागाशी संपर्क साधला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)