फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) येथे आज सकाळी 32 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे, मात्र अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. अश्विन अनुराग शुक्ला असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो आज सकाळी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, असे डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर कर्पे यांनी सांगितले.
Maharashtra | Body of a 32-year-old student was found hanging inside a hostel room at the Film and Television Institute of India (FTII), today morning. Prima facie it appears to be a case of suicide, further investigation underway: Pune Police officials
— ANI (@ANI) August 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)