GBS Death in Mumbai: गुईलेन-बॅरे सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) संक्रमित होऊन मुंबईत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. संक्रमित रुग्ण हे 53 वर्षीय होते. नायर हॉस्पीटलमध्ये ( Nair Hospital) मृत्यू झाल्याची माहिती आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी त्याबाबतची माहिती दिली. या घटनेआधी पुण्यातही सोमवारी एका 37 वर्षीय संक्रीत रुग्णाचा मृत्यू झाला होता. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण व्हेंटीलेटरवर होता. वडाळा येथील रहिवासी असलेला रूग्ण बीएमसी रूग्णालयात कामाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते.

गुईलेन-बॅरे सिंड्रोमचा मुंबईत पहिला बळी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)