Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या इम्यूनोलॉजिकल नर्व्ह डिसऑर्डरमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली असून, रविवारपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे. शहरातील आजाराची वाढती रुग्णसंख्या पाहता, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी पीएमसी संचालित कमला नेहरू रुग्णालयाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना जीबीएस रुग्णांसाठी 60 बेड राखीव ठेवण्याच्या सूचना दिल्या. फ्री प्रेस जर्नलशी बोलताना, कमला नेहरू रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत बोथे म्हणाले, ‘आज पीएमसी आयुक्तांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि जीबीएस रुग्णांसाठी 60 बेड राखीव ठेवण्याचे निर्देश दिले. आम्ही अतिदक्षता विभागात (ICU) 15 बेड आणि पुरुष आणि महिला वॉर्डमध्ये प्रत्येकी 15 ड राखीव ठेवले आहेत. आतापर्यंत, जीबीएसचा कोणताही रुग्ण दाखल झालेला नाही, परंतु आम्हाला आयसीयू प्रवेशाबाबत चौकशीचे कॉल येत आहेत. जीबीएस रुग्णांना, ते आधी ज्या ज्या डॉक्टरांकडे उपचार घेत होते त्यांच्या त्यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतरच आम्ही आयसीयूमध्ये दाखल करू.’ दुसरीकडे,  गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यात, राज्याला मदत करण्यासाठी केंद्राने सात सदस्यीय तज्ञांची टीम महाराष्ट्रात तैनात केली आहे. (हेही वाचा: Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा प्रादुर्भाव; आता WHO करत आहे परिस्थितीची पाहणी, संघटनेने दिली नांदेड गावाला भेट)

Pune Guillain-Barre Syndrome Cases-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)