पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) प्रकरणांमध्ये अलीकडेच वाढ झाली आहे. शहरातील रुग्णांची 101 वर पोहोचली आहे. आजाराच्या वाढत्या प्रसारामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी अलर्ट मोडमध्ये आहे. आता नुकतेच पुण्यात जीबीएसच्या प्रादुर्भावादरम्यान जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या पथकाने नांदेड गावाला भेट दिली. हा आजार मोठे आरोग्य संकट बनू नये, यासाठी जगातील आरोग्य संघटना आता परिस्थितीची पाहणी करत आहे. जीबीएस हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जिथे रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर हल्ला करते. पुण्याच्या बाबतीत, या आजाराच्या उद्रेकाच्या मूळ कारणाचा तपास जलद होऊ शकला नाही, जे दूषित पाणी किंवा अन्न पुरवठा असू शकते. मूळ कारण समजले असते तर, पुढील प्रकरणे टाळता आली असती. मागील आठवड्यात पुण्यात  24 संशयित प्रकरणांची प्राथमिक ओळख झाल्यानंतर, संक्रमणामध्ये अचानक वाढ झाल्याची तपासणी करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने मंगळवारी रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) स्थापन केली होती. (हेही वाचा: Pune Guillain-Barre Syndrome Cases: पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे 2 जणांचा मृत्यू; एकूण प्रकरणांची संख्या 100 च्या पुढे, 17 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर)

Pune Guillain-Barre Syndrome Cases:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)