मुंबईत झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने मुंबईत सापडलेल्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी करणारी माहिती शेअर केली आहे. झिका विषाणूचा संसर्ग 79 वर्षीय व्यक्तीमध्ये आढळून आला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवेदनानुसार, हा वृद्ध नागरिक सध्या निरोगी आणि बारा आहे. झिका व्हायरसच्या पहिल्या प्रकरणाची माहिती देताना, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लोकांना घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन केले आहे.

प्रसिद्धीनुसार, या वृद्ध व्यक्तीला 19 जुलै 2023 रोजी ताप, नाक बंद होणे आणि खोकला यांसारखी लक्षणे दिसू लागली. त्यानंतर खाजगी प्रॅक्टिसमध्ये डॉक्टरांकडून लक्षणात्मक उपचार घेतले. रुग्ण बरा झाल्यानंतर 2 ऑगस्ट रोजी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, वृद्धामध्ये संसर्गाची लक्षणे दिसू लागल्यानंतर नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी सेंटरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले. तेथून संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे. झिका संसर्ग हा स्वत: बरा होणारा आजार असल्याने लोकांनी घाबरून जाऊ नये, असे बीएमसीने म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)