Diwali 2023 Special Besan Ladoo Recipes: दिवाळीचा सण हा रोषणाईचा आणि स्वादिष्ट पदार्थांचा सण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या पदार्थांनी दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी पाहुण्यांची सतत वर्दळ असते. अशा वेळी जर तुम्ही डिशेस आधीच तयार करून ठेवल्या तर तुमचा वेळ वाचू शकतो. यावेळी बाजारातून पदार्थ आणण्याऐवजी तुम्ही ते घरीच करू शकता. यावेळी भेसळ मोठ्या प्रमाणात होते. यानिमित्ताने अशा वस्तूही बनवा ज्या तुम्ही दीर्घकाळ साठवून ठेवू शकता. यंदा दिवाळीत तुम्ही जिभेवर सहज विरघळतील असे साजूक तुपातील स्वादिष्ट लाडू बनवू शकता. खालील व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करू शकता. (हेही वाचा - Best Desserts In The World: भारतामधील Ras Malai आणि Kaju Katli यांचा जगातील सर्वोत्कृष्ट मिष्टान्नांमध्ये समावेश; Taste Atlas ने जारे केली यादी)

बेसन लाडू रेसिपी -

साहित्य :

२ वाटी बेसन पीठ

१/२ वाटी + ३ चमचे साजुक तुप

१ वाटी पिठीसाखर

१/२ चमचा वेलची पावडर

जायफळ पावडर

२ चमचे थंड पाणी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)