Happy Diwali on Burj Khalifa in Dubai: भारतासह जगभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी काल उत्साहात दिवाळीचा सर्वात महत्वाचा दिवस, म्हणजेच लक्ष्मीपूजन पार पडले. या मंगलमय पर्वाच्या निमित्ताने दुबईचा बुर्ज खलिफाही या आनंदाच्या उत्सवात सामील झाला. जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर दिवाळीच्या रात्री अनोख्या पद्धतीने रोषणाई करत, दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. बुर्ज खलिफावरील हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. दिवाळीच्या रात्री, बुर्ज खलिफावर एक विशेष लाइट शो आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये भारतीय पारंपारिक सजावट, दिवे आणि रंगीबेरंगी लाईट्स दिसल्या. या लाईट शो दरम्यान बुर्ज खलिफावर हिंदीतील 'हॅपी दीपावली' हा संदेश दिसला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Happy Diwali on Burj Khalifa in Dubai:
Last night, the Burj Khalifa in #Dubai illuminated the skyline with a stunning display, wishing a very happy Diwali to all celebrating. #Diwali2024 #BurjKhalifa pic.twitter.com/7mXSG3FI57
— All India Radio News (@airnewsalerts) November 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)