पैलवान विजय चौधरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर गणपती समोर डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पोलीस सेवेत असलेले चौधरी खाकी वर्दीत या व्हिडिओत ते गणपती समोर डान्स करताना दिसतात. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कामातून वेळ काडत आज गणेश चतूर्थी निमीत्त आपल्या कडे गणपती बसवताना वाजत गाजत नाचत बसवला जातो तर आज नाचण्याचा मोह आवरला गेला नाही आणि गणपती समोर नाचलो खूप भारी वाटले ..आपण सगळे या वर्षी काळजी घेऊ आणि पुढच्या वर्षी नक्की गणेश उत्सव जोरात करु. सगळ्यांनी काळजी घ्या,घरी राहा व घरूनच online बाप्पांचं दर्शन घ्या स्वतःला पण करोना पासून वाचवा आणि आपण घेतलेल्या काळजी मुळे आम्ही पोलीस व सर्व गणेश मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी सुरक्षित राहतील !

जय हिंद जय महाराष्ट्र!

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)