कार्तिकी एकादशी निमित्त आज पहाटे पंढरपूरामध्ये श्री विठ्ठल-रूक्मिणीची शासकीय पूजा संपन्न झाली आहे. आज कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रूक्मिणीला खास वस्त्रांनी आणि अलंकारांनी सजवलं जातं. कार्तिकी निमित्त अनेकांनी आज पंढरपूरात दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. ज्यांना थेट पंढरपूरात जाणं शक्य नाही त्यांच्यासाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था आहे.  vitthalrukminimandir.org वर हे दर्शन उपलब्ध आहे. सोबतच  Jio TV वर देखील पंढरपूरातील विठ्ठल-रूक्मिणी मातेचं घरबसल्या दर्शन घेता येईल.

पहा आजचं विठ्ठल रूक्मिणीचं रूप

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)