Kartiki Ekadashi Puja | X @DevendraFadnavis

कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त आज पहाटे पंढरपूरामध्ये विठ्ठल रूक्मिणीची शासकीय पूजा संपन्न झाली आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सपत्निक पूजेला हजर होते. तर यंदा मानाचे वारकरी म्हणून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला गावातील यावेळी मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. व सौ. वत्सला बबन घुगे यांना शासकीय महापूजेचा मान मिळाला. त्यानंतर दोन्ही दांपत्यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीतर्फे सत्कार देखील करण्यात आला आहे. पूजेच्या वेळेस सोलापूर पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते.

'महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती सुखी झाला पाहिजे हेच विठुरायाकडे मागणं आहे, तसेच, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी,' असं साकडं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं आहे. ' राज्यात अनेक ठिकाणी बळीराजा संकटामध्ये आहे. अवर्षणग्रस्त शेतकरी आहेत, शेतकऱ्याला समाधान देण्याची शक्ती विठुरायानं आम्हाला द्यावी. राज्यात आज अनेक समाजाचे प्रश्न आहेत. मराठा समाज, धनगर समाज, ओबीसी, आदिवासी समाजाचे प्रश्न आहेत. ज्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये सर्वांसाठी प्रार्थना मागितली, त्याच पद्धतीनं विठुराया चरणी मी मागणं मागतो की, सर्वांच्याच मनोकामना पूर्ण करण्याची ताकद त्यानं आम्हाला द्यावी." असं ते म्हणाले आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर व संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजनदेखील देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झाले आहे.  नक्की वाचा: Prabodhini Ekadashi 2023 Messages In Marathi: प्रबोधिनी एकादशीच्या शुभेच्छा Facebook Messages, Wishes, WhatsApp Status द्वारा शेअर करत साजरी करा कार्तिकी एकादशी! 

पहा यंदाची विठ्ठठ रूक्मिणीची संपूर्ण महापूजा

दरम्यान राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना उपमुख्यमंत्र्यांना विठ्ठलाच्या शासकीय पूजेत सहभागी न करण्याचा सूर मराठा समाजाचा होता. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करत आंदोलकांची बैठक घेतली. त्यांच्या 5 मागण्या पूर्ण करून देण्यात हातभार लावला. उपमुख्यमंत्र्यांशी भेट घडवून दिल्यानंतर त्यांचाही विरोध मावळला आणि फडणवीसांचा निर्विघ्नपणे पूजेत सहभाग झाला.