ठाण्याच्या टेंभीनाक्याच्या नवरात्र उत्सवाचं आकर्षण सार्‍यांनाच असतं. देवीचं लोभसवाणं रूप पाहण्याची भाविकांची मोठी गर्दी होते. या देवी आणि नवरात्र उत्सवाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जुना संबंध आहे. आज देवीच्या आगमन सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी जातीने हजेरी लावली होती. "48 वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी हा देवी महोत्सव सुरू केला... हा श्रद्धेचा आणि परंपरेचा विषय आहे... उत्सव काळात येथे दररोज दर्शन घेण्यासाठी लोक येतात... आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या परंपरा पुढे नेल्या जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परंपरा पुढे नेल्या पाहिजेत..." अशी प्रतिक्रिया ANI शी बोलताना श्रीकांत शिंदेंनी दिली आहे.

पहा ट्वीट

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)