Trainer Aircraft Crash: मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील किरणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भक्कुटोला गावातील घनदाट जंगलात शनिवारी दुपारी एक ट्रेनर चार्टर विमान कोसळले. या अपघातानंतर पायलट बेपत्ता आहेत. शोधपथक वैमानिकांचा शोध घेत आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक (नक्षल) आदित्य मिश्रा यांनी सांगितले की, किरणापूरमधील भक्कुटोला येथे एक ट्रेनर विमान कोसळल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांचा ताफा घटनास्थळी रवाना झाला आहे. अद्याप या वैमानिकांची नावे, विमान कुठे जात होते आणि विमान अपघाताची कारणे समजू शकलेली नाहीत. याबाबत पोलिसांकडेही अद्याप ठोस माहिती नाही.
Trainer aircraft crashes in Madhya Pradesh's Balaghat district; two pilots missing: Police
— Press Trust of India (@PTI_News) March 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)