रोड रेज प्रकरणी नवज्योत सिंह सिद्धू यांना मोठा झटका बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे रोड रेज प्रकरण 1988 चे आहे. या प्रकरणी नवज्योतसिंह सिद्धू यांना यापूर्वी दिलासा मिळाला होता, मात्र रोड रेजमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आता त्याची सुनावणी करताना सिद्धूला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवज्योतसिंह सिद्धू यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस नेत्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, मी कायद्याचे पालन करेल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)