Leader of Aam Aadmi Party: आदमी पार्टी (AAP) ने त्यांचे खासदार (MP), राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाचे नवीन नेते म्हणून नियुक्त केले आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात, AAP नेतृत्वाने सिंह यांच्या अनुपस्थितीचे कारण म्हणून आरोग्याच्या समस्यांचा उल्लेख केला आणि राघव चढ्ढा यांना वरच्या सभागृहात पक्षाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले. आपचे खासदार संजय सिंह सध्या दिल्ली मद्य धोरण प्रकरणी तुरुंगात आहेत. राज्यसभेतील सर्वात तरुण सदस्यांपैकी राघव चड्ढा आता वरच्या सभागृहात 'आप'च्या 10 खासदारांच्या तुकडीचे नेतृत्व करतील. (वाचा - SC On Raghav Chadha: राघव चढ्ढा यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांची माफी मागावी; सर्वोच्च न्यायालयाची सूचना)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)