उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या १७व्या दिवशी अखेर सर्व 41 मजुरांना बाहेर काढण्यात यश आले आहे. सर्व कामगारांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बोगद्यात 41 मजूर गेल्या 17 दिवसांपासून अडकले होते. अनेक एजन्सींच्या अथक परिश्रमानंतर आता कामगार बाहेर पडले आहेत. कामगारांना सुरक्षित बाहेर काढल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पीएम मोदी म्हणतात, ‘उत्तरकाशीतील आमच्या मजूर बांधवांच्या बचावकार्याचे यश सर्वांनाच भावूक करणारे आहे. बोगद्यात अडकलेल्या मित्रांना मी सांगू इच्छितो की तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देणारे आहे. मी तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य इच्छितो. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमचे हे मित्र आता त्यांच्या प्रियजनांना भेटणार आहेत ही समाधानाची बाब आहे. या आव्हानात्मक काळात या सर्व कुटुंबांनी दाखवलेल्या संयमाचे आणि धैर्याचे कौतुक आहे.’

ते पुढे म्हणतात, ‘या बचाव कार्याशी संबंधित सर्व लोकांना मी सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि जिद्दीने आमच्या कामगार बांधवांना नवसंजीवनी दिली आहे. या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाने माणुसकी आणि टीमवर्कचे एक अद्भुत उदाहरण सादर केले आहे.’ (हेही वाचा: उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांची सुखरुप सुटका; सलग 17 दिवस चाललेल्या मदत आणि बचावकार्यास यश)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)