उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात आज 17 व्या दिवशी टीमला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी रात्री साडेसातच्या सुमारास कामगारांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत 33 कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. यापूर्वी सीएम पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट केले होते, ज्यामध्ये त्यांनी बोगद्यात सुरू असलेल्या बचाव कार्यात मोठे यश मिळाल्याचे सांगितले होते. ढिगारा ओलांडून पाईप पुशिंगचे काम करण्यात आले आहे. आता कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बोगद्याच्या आत 800 मिमीचा पाइप टाकण्यात आला होता. ज्याद्वारे सर्व 41 मजुरांना एक एक करून बाहेर काढण्यात येत आहे. बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर कामगारांची वैद्यकीय तपासणी करता यावी यासाठी त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात येत आहे. गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले आहेत. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. (हेही वाचा: Blast in Bihar: बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यात पडक्या घरात ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट; सहा मुले जखमी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)