जुलै 2022 म्हणजे गेल्या महिन्यात देशात आजपर्यतच्या सर्वाधिक UPI द्वारे  व्यवहारांची नोंद करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती नॅशनल पेमेंट कॉर्पोरशेन ऑफ इंडियाकडून (National Payment Corporation Of India)  देण्यात आली आहे. तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी देखील त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर यासंबंधी ट्वीट (Tweeter Account) केले आहे. संबंधित पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. कोविड-19 महामारीच्या कालावधीत डिजीटल पेमेंट अधिक उपयुक्त ठरले अशी प्रतिक्रीया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) दिली आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्याबाबत आणि डिजीटल (Digital) माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला (Economy) भारतीयांनी दिलेल्या सामुहिक प्रतिसादाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांचे कौतुक केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)