देशातील सर्वात श्रीमंत देव तिरुपती बालाजीच्या दर्शनाची ऑनलाईन बुकींग पुन्हा सुरु करण्यात आली आहे. तरी तुम्हीही तिरुपतींच्या दर्शनाचा प्लान करत असल्यास ही बातमी तुमच्यासाठी आहे. १२ जानेवारी ते ३१ जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दर्शनाच्या ऑनलाईन बुकींला आज सकाळी १० वाजता पासून सुरुवात करण्यात आली आहे. तिरुपती बालाजी देवस्थानम या अधिकृत  वेबसाईटला भेट देत तुम्हाला तुमच्या दर्शनाची सहज बुकींग करता येणार आहे. तरी या पास सेवेच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यासह तुमच्या कुटुंबियांच्या दर्शनाचं बुकींग देखील करता येणार आहे. या सुचना मंदिर प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)