Obscene Dance In Front Of Lord Ganesh’s Idol: तिरुपतीमध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर महिलांनी केले अश्लील नृत्य; गुन्हा दाखल, 7 जणांना अटक (Video)
व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अलीपिरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. तिरुपतीच्या सप्तगिरी नगर येथील विनायक मंडपम येथे ही घटना घडली.
Obscene Dance In Front Of Lord Ganesh’s Idol: सध्या देशभरात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात ढोल-ताशांच्या गजरात हा सण साजरा होतो. मात्र सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका गणपती मंडळात साडी नेसलेल्या महिला गणेशमूर्तीसमोर अश्लील नृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर अलीपिरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सात जणांना अटक केली आहे. तिरुपतीच्या सप्तगिरी नगर येथील विनायक मंडपम येथे ही घटना घडली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तरुणी आणि पुरुषांनी गणपतीच्या मूर्तीसमोर अश्लील नृत्य केल्याचे वृत्त आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ताकीद दिली आहे की, सध्या सुरू असलेल्या उत्सवादरम्यान गणपतीच्या मूर्तींसमोर कोणतेही अश्लील नृत्य सादर केले जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा: Reel Goes Wrong: रील बनवताना तोल गेला अन् तरूणी गंगा नदीत पडली)
तिरुपतीमध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर महिलांनी केले अश्लील नृत्य-
तिरूपति के गणेश पंडाल में 'अश्लील' नृत्य. पुलिस ने केस दर्ज किया. #Tirupati । #GaneshPandal pic.twitter.com/KBPqHBx7Zr
— News Jungal Media Pvt. Ltd. (@newsjungal) September 11, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 11, 2024 05:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

