चंदीगड महापौर निवडणुकीतील गैरव्यवहारावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी घेतली. सरन्यायाधीशांना पीठासीन अधिकाऱ्यांचा व्हिडिओ दाखवण्यात आला. पीठासीन अधिकारी मतांमध्ये खाडाखोड करून छेडछाड करत असल्याचे दिसल्यानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या गैरप्रकाराचा निषेध नोंदवला. या प्रकरणी रिटर्निंग अधिकारी अनिल मसिह यांनी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)