गुजरातमध्ये उच्च न्यायालयाने एका 45 वर्षीय प्राध्यापकाचे पाच वर्षांचे लग्न मोडून काढणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवला आहे. आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकाशी लग्न करण्यास भाग पाडले होते. न्यायालयाने क्रूरतेचे कारण देऊन विद्यार्थिनी-पत्नी घटस्फोट घेण्यास पात्र ठरेल, असे नमूद केले. न्यायमूर्ती एन.व्ही.अंजारिया आणि न्यायमूर्ती संदीप एन भट्ट यांच्या खंडपीठाने, 45 वर्षीय प्राध्यापकाचे पाच वर्षांचे लग्न मोडण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
खंडपीठाने 25 जानेवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘क्रूरता ही परिभाषित संकल्पना नाही. एका विद्यार्थिनीला शिक्षकाशी लग्न करण्यास भाग पाडले गेले. दोघांमधील वय आणि संभावनांमध्ये खूप फरक आहे आणि सध्याच्या प्रकरणात लग्नानंतरच्या (विद्यार्थिनीच्या) वागण्यावरून तिच्यावर अत्याचार झाल्याचे सिद्ध होते.’ अमरेली जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. कौटुंबिक न्यायालयाने क्रूरतेचे कारण देत पत्नीला घटस्फोट मंजूर केला होता. शिक्षकाने मुलीवर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. लग्नानंतर होत असलेल्या छळाला कंटाळून विद्यार्थिनीने कौटुंबिक न्यायायात धाव घेतली होती.
Student forced to marry teacher entitled to divorce on ground of cruelty: Gujarat High Court
report by @NarsiBenwal https://t.co/Oo5uVpAJki
— Bar & Bench (@barandbench) February 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)