Seat Cushion Missing on IndiGo Flight: रोडवेज बसमधील सीटवरून कुशन गायब होणे सामान्य गोष्ट आहे, परंतु चक्क विमानातल्या सीटवरून कुशन गायब होऊ शकते यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. मात्र नुकतेच देशातील एक मोठी एअरलाइन इंडिगोच्या फ्लाइटमध्ये असे दृश्य पाहायला मिळाले. एका प्रवाशाने सीटवरून कुशनच गहाळ झाल्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या या प्रकरणाची खूप चर्चा होत असून यूजर्स त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. यवनिका राज शाह या मुलीने सोशल मिडिया एक्सवर याबाबत माहिती दिली आहे. तिने लिहिले आहे, ‘सुंदर इंडिगो, मला आशा आहे की मी सुरक्षितपणे उतरेन. ही तुमची बेंगळुरू ते भोपाळ 6E 6465 फ्लाइट आहे.’ या शेअर केलेल्या फोटोमध्ये महिला प्रवाशाला दिलेल्या सीटवरून एक कुशन गहाळ झाल्याचे दिसत आहे. (हेही वाचा: 'Dark Parle-G' चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; यूजर्स देत आहेत 'अशा' प्रतिक्रिया)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)