'Dark Parle-G' चा फोटो सोशल मीडियावर व्हायरल; यूजर्स देत आहेत 'अशा' प्रतिक्रिया
Dark Parle-G viral Photo (PC - X/@sagarcasm)

Dark Parle-G viral Photo: लोकांना त्यांचे आवडते बिस्किट कोणते? असा प्रश्न केला तर नक्कीच यात पार्ले-जी (Parle-G) बिस्किट पहिल्या क्रमांकावर असेल. लहान मूल असो किंवा म्हातारी व्यक्ती असो पार्ले बिस्किटे (Biscuit) सर्वांनाच आवडतात. हे एक असे बिस्किट आहे जे सर्व वयोगटातील आणि वर्गातील लोकांना आवडते. आता तुम्ही विचार करत असाल की, अचानक पार्ले-जी बिस्किटांची चर्चा का सुरू झाली. वास्तविक, सध्या पार्ले-जी बिस्किटच्या एका नवीन प्रकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @sagarcasm नावाच्या अकाऊंटवरून एक फोटो शेअर करण्यात आले आहे. या चित्रात तुम्हाला पार्ले-जी बिस्किटांचे पॅकेट दिसेल. पण यातील बिस्किटाचा रंग बदललेली दिसत आहे. हे पॅकेट डार्क थीमवर बनवण्यात आले आहे. इतकंच नाही तर याला 'डार्क पार्ले-जी' असं नावही देण्यात आलं आहे. पाकिटाबाहेर काळपट दिसणारी दोन बिस्किटे दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'जेव्हा प्रशांत नील तुमचा नवीन चीफ मार्केटिंग ऑफिसर असेल.' (हेही वाचा - Video- Dal With 24-Carat Gold: 24 कॅरेट सोन्याची तडका डाळ, रेसिपी दुबईत प्रसिद्ध, पाहा व्हिडीओ

पहा फोटो -

हा फोटो पाहिल्यानंतर लोकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'माझे भविष्य तितके अंधकारमय नाही जितके त्यांनी पार्ले-जी बनवले आहे.' दुसऱ्या यूजरने लिहिले आहे, 'हा ओरियो विदाऊट क्रीम आहे.' तिसऱ्या यूजरने लिहिले आहे, 'लोकांसोबत आता पार्ले जीनेही रंग बदलण्यास सुरुवात केली आहे.' दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'हे चारकोल फ्लेवर्ड पार्ले-जी आहे.' एका यूजरने लिहिले आहे की, 'मी हे इतर कुठेही पाहिले नाही, हे बनावट आहे.' (Gurugram Restaurant Shocker: माऊथ फ्रेशनर खाल्ल्यानंतर तोंडात सुरु झाली जळजळ, रक्ताच्या उलट्या; गुरुग्रामच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल (Watch Video))

हा फोटो सोशल मीडियावरच व्हायरल होत आहे. तथापी, पार्ले-जीच्या वेबसाइटवरही असे कोणतेही उत्पादन दिसत नाही. हे एडिट केलेले छायाचित्र असण्याची शक्यता आहे. ज्याच्या फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.