Sanjay Singh Gets Bail: आम आदमी पार्टी(AAP)चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. दिल्ली(Delhi) दारू धोरणाशी संबंधित घोटाळ्याप्रकरणी ते सहा महिने तुरुंगात होते. संजय सिंग यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सांगितले की, ते राजकीय कार्यातही सहभागी होऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आप खासदाराच्या वकिलाचा युक्तिवाद मान्य केला की संजय सिंह यांच्याकडून एकही पैसा जप्त करण्यात आलेला नाही आणि त्याच्यावर 2 कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते. (हेही वाचा :K Kavitha Arrested: दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई; माजी मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के कविता यांना अटक )
Supreme Court directs to release AAP MP Sanjay Singh on bail during the pendency of trial in a money laundering case relating to excise policy irregularities matter.
(File photo) pic.twitter.com/fBfcdHAWST
— ANI (@ANI) April 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)