अलाहाबाद उच्च न्यायालयाने बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी, महिलेला तिच्या मांगलिक स्थितीची खात्री करण्यासाठी कुंडली सादर करण्याचे आदेश दिले  होते. लग्नाच्या बहाण्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या जामीन अर्जावर निर्णय घेण्यासाठी, अलाहाबाद उच्च न्यायालयाने लखनौ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाला महिलेच्या कुंडलीचा (जन्म पत्रिका) अभ्यास करण्याचे आदेश दिले. आहेत. ही महिला मांगलिक असल्याने आपण तिच्याशी विवाह करू शकत नाही, असा आरोपीने बचाव केला आहे. मात्र महिलेच्या वकिलांनी ती मांगलिक नसल्याचा युक्तिवाद केला. त्यामुळे दोघांच्याही कुंडल्या ज्योतिष विभागाकडे जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते.

आता सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, जामीन अर्जावर निर्णय देताना न्यायालय ज्योतिषाच्या क्षेत्रात प्रवेश करू शकत नाही. ही व्यक्तीची खाजगी बाब आहे. (हेही वाचा: अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला बलात्कार पीडितेची कुंडली तपासण्याचा आदेश; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)