HC On Rape Victim’s Kundali: अलाहाबाद उच्च न्यायालयाचा (Allahabad High Court) एक आदेश सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. या आदेशात अलाहाबाद उच्च न्यायालयाने बलात्कार पीडितेची कुंडली (Kundali) तपासण्याचे आदेश दिले आहेत. असे या आदेशात स्पष्ट लिहिले आहे. लखनऊ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाने कुंडली तपासल्यानंतर बलात्कार पीडितेच्या कुंडलीत मांगलिक दोष आहे की नाही ते सांगा? असंही न्यायालयाने म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये अलाहाबाद विद्यापीठाचे एक प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये विद्यापीठाच्या एका प्राध्यापकावर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी बलात्कार पीडितेच्या तक्रारीवरून प्राध्यापकाला तुरुंगात टाकण्यात आले आहे. (हेही वाचा - Delhi Liquor Scam: दिल्ली हायकोर्टाने अंतरिम दिलासा दिल्यानंतर तुरुंगातून बाहेर आले मनीष सिसोदिया; आजारी पत्नीला भेटण्यासाठी पोहोचले निवासस्थानी)
बलात्कार प्रकरणातील आरोपी प्राध्यापकाने अलाहाबाद उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर हायकोर्टात सुनावणीदरम्यान आरोपीने आपल्या वकिलामार्फत सांगितले की, पीडित मुलगी मांगलिक आहे, त्यामुळे प्राध्यापक तिच्याशी लग्न करू शकत नाही. या आरोपीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने लखनऊ विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाला काही गोष्टी लक्षात घेऊन बलात्कार पीडितेची कुंडली तपासण्याचे आदेश दिले आहेत.
अलाहाबाद विद्यापीठाच्या प्राध्यापकाच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. लखनऊ युनिव्हर्सिटीचा ज्योतिष विभाग आठवडाभरात कुंडली तपासून सांगेल की बलात्कार पीडित मुलगी मांगलिक आहे की नाही. उच्च न्यायालयाने पीडितेची कुंडली बंद लिफाफ्यात मागवली आहे.