राजमाता जिजाऊ यांचा आज तारखेनुसार पुण्यतिथीचा दिवस आहे. यानिमित्ताने विरोधी पक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह गिरिश महाजन यांनी आपली आदरांजली ट्वीट करत अर्पण केली आहे. जिजाऊ यांचे शिवबांच्या आयुष्यात मोलाचे स्थान होते. एक आई, कुशल प्रशासक म्हणून त्या आजही अनेक महिलांसाठी प्रेरणा ठरत आहेत. नक्की वाचा: राजमाता जिजाबाई पुण्यतिथी निमित्त Facebook Status, HD Images शेअर करून करा जिजाऊंना विनम्र अभिवादन!
जिजाऊंना आदरांजली
अमोल कोल्हे
राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी वंदन! #jayjijaujayshivray #jijamata #RajmataJijau pic.twitter.com/94AxJNOiMJ
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) June 17, 2023
सत्यजित तांबे
छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज पुण्यतिथी! त्यांच्या रुपात या महाराष्ट्राला साक्षात आदिशक्तीचे दर्शन घडले. शिवरायांच्या अंगी देशप्रेम आणि एकनिष्ठतेची बीजे रुजवणान्या या थोर मातेस मानाचा मुजरा !#RajmataJijau pic.twitter.com/meUdB2gPPS
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) June 17, 2023
गिरीष महाजन
स्वराज्याच्या प्रेरणास्रोत राजमाता जिजाऊ यांना पुण्यतिथी निमित्त त्रिवार वंदन !#RajmataJijau#राजमाता_जिजाऊ pic.twitter.com/N8WxP2seOX
— Girish Mahajan (@girishdmahajan) June 17, 2023
सुप्रिया सुळे
छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतीदिन. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
My humble tribute to Rajmata Jijau on her death anniversary. 🙏🏻 pic.twitter.com/HUafcGsTD7
— Supriya Sule (@supriya_sule) June 17, 2023
अजित पवार
आपल्या मनातील स्वराज्याचं स्वप्न हे युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून, त्यांच्या कार्य कर्तृत्वातून सिद्ध करणाऱ्या, महाराजांच्या माध्यमातून स्वराज्य उभारणीचा भक्कम पाया रचणाऱ्या स्वराज्यजननी, राजमाता, माँसाहेब जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/iUisG9Auva
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)